सस्नेह नमस्कार ,

आपल्या ठाण्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली २५० वर्षांची प्राचीन,स्वयंभू पण खाजगी मालकीची श्री घंटाळी मंदिर वास्तू तिच्या ४ वारसदारांकडून १० नोव्हेंबर २०२३, धनत्रयोदशी च्या शुभमुहूर्तावर आपल्या हिंदू जागृती न्यासाने खरेदी केली आहे.
सदर मंदिराच्या जागेवर कुठलेही व्यापारी बांधकाम करायचे नाही, असा हिंदू जागृती न्यासाचा प्रथमपासूनच निर्धार असल्याने वास्तू खरेदी साठी लागणारा सुमारे २.५ कोटी निधी हा लोकवर्गणीने आणि कर्जरूपाने गोळा करण्यात येऊन सदर वास्तू खरेदी करार पूर्ण करण्यात आला. आम्ही केलेल्या लोकवर्गणीच्या आवाहनास भरघोस प्रतिसाद मिळत असून मोठी रक्कम घंटाळी देवीवरील नागरिकांच्या प्रेम,आपुलकी व श्रद्धेमुळे व हिंदू जागृती न्यासावरील विश्वासामुळेच उभी राहिली, हे नक्की .
अर्थात, उरलेली कर्ज रक्कम व अन्य तातडीचा जीर्णोद्धार खर्च तसेच घंटाळी मंदिराने संकल्पित केलेल्या विविध उपक्रमांचे मिळून अजूनही मोठा खर्च आपल्या समोर आहे. तरीही आपल्या इच्छेनुसार आपण वैयक्तिक रीत्या किंवा आपल्या आस्थापनेद्वारे अधिकाधिक देणगी/जाहिरात द्यावी, ही नम्र विनंती.

अधिक संपर्क व माहीतीसाठी
- श्री. सचिन कामत (Mobile No.-9324004630)