|| घंटाळी देवीची आरती ||
जय देवी जय देवी माते घंटाळी
सद्भावे सप्रेमे तुजला ओवाळी ॥धृ॥
एका आसनी, तुम्ही तिघी भगिनी
दुर्गा घंटाळी महिषासुरमर्दिनी
भासता रमा, उमा, सावित्री वेल्हाळी ||१॥
ठाणे नगरी, घंटाळी भागी भक्तासाठी जगत् - जननी उभी
आम्हा लेकरा तू सदा सांभाळी ||२॥
प्रवेशद्वारी तुझ्या भव्य कमान
त्यावरी कोरीले तुझेच नाम
दीपमाळा दोन्ही प्रकाश उजळी ॥३॥
नवरात्री नऊ दिवस तुझा उत्सव
होम हवन भजने मन प्रसन्न
दर्शना दाटी तुझ्या प्रांगणी ॥४॥
शालू पैठणी दाग-दागिने
दर्शन देतेस तू प्रसन्न मने
हिरवा चुडा हाती मळवट भाळी ॥५॥
नवसाला पावसी ही तुझी ख्याती
नवस फेडाया घंटा बांधिती
म्हणोनी नाम असे घंटाळी ॥६॥